शिरोली Sangali फाटा येथील महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू | Lokmat News

शिरोली Sangali फाटा येथील महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू | Lokmat News

कोल्हापूर - पुणे-बंगळुर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. त्यामुळे लहान प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या मात्र आता दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. फक्त दुचाकी वाहतूक बंद आहे.br br तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. बेळगावपर्यंत वाहतूक सुरू असून गरज असेल तरच बाहेर पडा. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही असं कोल्हापूर पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी म्हटलं आहे. ..br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:48