चक्क.. नारळाच्या झाडाचे झाले डोहाळे जेवण | Hello Pune

चक्क.. नारळाच्या झाडाचे झाले डोहाळे जेवण | Hello Pune

पुणे : पुणे तिथे काय ऊणे असे म्हंटले जाते. पुणेकर काय करतील याचा नेम नसताे. त्यातच वेगवेगळ्या उपक्रमांमधून पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. असाच एक प्रकार आता पुण्यातील कर्वेनगर भागात घडला आहे. येथील नीता यादवाड यांनी आपल्या नारळाच्या झाडाला तुरा आल्याने त्यांनी त्यांच्या झाडाचे डाेहाेळे जेवण करण्याचा निर्णय घेतला. ज्या पद्धतीने एखाद्या स्त्रीच्या डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जाताे, तसाच कार्यक्रम करण्यात आला. br br सिमेंटच्या जंगलात वृक्षांची संख्या कमी हाेत चालली आहे. त्यामुळे निसर्गाचं चक्र बिघडलं आहे. पर्यावरणाचं रक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याच विचारातून नीता यादवाड यांनी हा कार्यक्रम आयाेजित केला हाेता. नीता यांना वृक्षांची आवड आहे. त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बागेत अनेक वृक्ष लावली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी रत्नागिरीवरुन एक नाराळाचे झाड त्यांच्या बंगल्याच्या एका भागात लावले हाेते. कालांतराने त्यांच्या बंगल्याच्या बाजूला एक माेठी इमारत तयार हाेणार हाेती. त्यामुळे त्या वृक्षाला सूर्यप्रकाश मिळणे कठीण जाणार हाेते. त्याचबराेबर त्या इमारतीला देखील अडथळा हाेण्याची शक्यता हाेती. त्यामुळे त्यांनी ताे वृक्ष तेथून काढून दुसरीकडे लावण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ठिकाणी ताे वृक्ष लागू शकेल का याबाबत साशंकता हाेती. परंतु ते झाड उत्तमप्रकारे वाढलं तसेच त्याला तीन आठवड्यांपूर्वी तुरा सुद्धा आला. त्यामुळे काही दिवसात त्याला नारळ लागण्यास सुरुवात हाेणार आहे. आपण मुलासारखं वाढवलेल्या झाडाला फळ येणार याचा नीता यांना अत्यंत आनंद झाला. त्यामुळे त्यांनी त्या झाडाच्या डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. या साेहळ्याला त्यांच्या अनेक मैत्रीणी हजर हाेत्या. एखाद्या स्त्रीचा ज्याप्रकारे डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जाताे. तसाच कार्यक्रम यावेळी करण्यात आला. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:13

Your Page Title