Sharad Pawar | राष्ट्रवादीने धरले मु्ंबईकरांना वेठीस | ED notice | Lokmat LIVE

Sharad Pawar | राष्ट्रवादीने धरले मु्ंबईकरांना वेठीस | ED notice | Lokmat LIVE

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज Enforcement Directorate म्हणजेच ईडीच्या कार्यालयात जाणार होते. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने पवार यांच्यासह ६० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दाखल करण्यात आले आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी सुड बुध्दीने वागत असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी स्वतःच ईडीसमोर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही ही संधी चालून आली आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रीय झाले. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार म्हणून पोलिसांनी मुंबईत येणाऱ्या तिन्ही प्रमुख महामार्गांवर नाकाबंदी केली. त्याचा फटका मुंबईकरांना बसला. रस्ते तर वाहनांनी तुंबलेच पण रेल्वे स्टेशन्सवरही चेंगरा चेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. हे सगळं झाले ते शरद पवार यांच्या हट्टापायी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी मुंबईला वेठीस धरल्यामुळे. मुंबईकरांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेतbr आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #Shardpawar #ednotice #ncp br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6.1K

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:18

Your Page Title