MLA Bhaskar Jadhav | राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव थेट विधानसभाध्यक्षांचा घरी

MLA Bhaskar Jadhav | राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव थेट विधानसभाध्यक्षांचा घरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (13 सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ते शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाधव यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षप्रवेश देतील. आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी ते सकाळी चार्टड विमानानं औरंगाबादला (Aurangabad) रवाना झाले होते. तेथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला.br br आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी औरंगाबादला जाताना भास्कर जाधव यांच्यासोबत यावेळी शिवसेनेचे नेते रामदार कदम, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत हेही उपस्थित आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि विधान परिषद शिवसेना गटनेते अॅड. अनिल परब हेही औरंगाबादमध्ये उपस्थित राहणार आहेत.br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1.6K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:28

Your Page Title