Nashik New Mayor Satish Kulkarni | नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी | Nashik News

Nashik New Mayor Satish Kulkarni | नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी | Nashik News

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.br या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपला साथ केले. त्याच प्रमाणे भाजपच्या दहाही बंडखोरी मागे घेऊन भाजपला पाठिंबा केल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.br राज्यात होत असलेल्या महाशिवआघाडी प्रमाणे नाशिक मध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातच भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले 10 ते 15 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते त्यामुळे 65 नगरसेवक असूनही भाजप अडचणीत आली होती मात्र मनसेने भाजपला पाठींबा दिला तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला आणि महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला.br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #Nashik #SatishKulkarni #Mayor br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 551

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:41

Your Page Title