Shree Mahalaxmi Mandir | प्रसन्न करणारा अनुभव | अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा | Kolhapur

Shree Mahalaxmi Mandir | प्रसन्न करणारा अनुभव | अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा | Kolhapur

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. त्यामुळे अंबाबाई देवीचा किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते.br रविवारी पाच वाजून ३६ मिनिटांनी सुर्यकिरणे मंदिराच्या पितळी उंबरठ्यावर पोहोचली. पाच वाजून ४० मिनिटांनी ती गारेच्या पायरीवर पोहोचली. त्यानंतर दुसºया पायरीवर ती पाच वाजून ४२ मिनिटांनी पोहोचली. तिसºया पायरीवर किरणे पाच वाजून ४३ मिनिटांनी पोहोचली. पाच वाजून ४४ मिनिटांनी ती कटांजली, तर पाच वाजून ४५ मिनिटांनी कमरेपर्यंत व पाच वाजून ४६ मिनिटांनी गळ्यापर्यंत पोहोचली. किरणांची तीव्रता कमी होत असतानाच अचानकपणे किरणांनी देवीच्या मुखकमलापर्यंत पोहोचून डावीकडे लुप्त होणे पसंत केले. चरणस्पर्श ते मुखकमल असा किरणांचा प्रवास झाल्यानंतर किरणोत्सव पूर्ण झाल्याचे मानले जाते. याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व खगोलशास्त्रीय अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दुजोरा दिला.br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br #LokmatNews #ShreeMahalaxmiMandi #Kolhapurbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:53

Your Page Title