पंकजा मुंडेसाठी तो वर्षभर फिरला अनवाणी | Pankaja Munde Fan - Nitin Mahajan | Maharashtra News

पंकजा मुंडेसाठी तो वर्षभर फिरला अनवाणी | Pankaja Munde Fan - Nitin Mahajan | Maharashtra News

कार्यकर्ते हे आपल्या नेत्यावर असलेलं प्रेम हे वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी व्यक्त करत असतात. सोहळे-कार्यक्रम बॅनर, सोशल मिडीया यातून आपल्या नेत्यावर असलेलं प्रेम कार्यकर्ते दाखवतात. पण पंकजा मुंडेंच्या या कार्यकर्त्याने अनोख्या पद्धतीने आपल्या नेत्यावर असलेलं प्रेम व्यक्त आहे. आणि पंकजा मुंडेंनीही या प्रेमाची दखल घेतली. br परळीतून पंकजा मुंडेचा झालेला पराभव हा अनेक कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागला. त्यानंतर नितीन महाजन या बीड जिल्ह्यातील धामणगावच्या कार्यकर्त्याने पंकजा मुंडे जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत आपण चप्पल घालणार नसल्याचा पण केला होता. गेल्या एक वर्षांपासून तो सर्वत्र अनवाणीच फिरायचा. पण दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे ही माहिती कळाली तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्याला चप्पला घालण्याचा आग्रह धरला. पंकजा मुंडे यांनी स्वहस्ते आपल्या कार्यकर्त्याला चप्पल देऊन त्या परिधान करण्यास सांगितले. याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती.br br #lokmat #NitinMahajan #PankajaMunde #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:27

Your Page Title