अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन | Arnab Goswami Gets Bail | India News

अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन | Arnab Goswami Gets Bail | India News

चार तारखेपासून तुरूंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी हे आज किंवा उद्या तुरूंगातून सुटणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानी त्यांना जामिन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामीसह ईतर दोन आरोपींनाही ५० हजार रूपयांच्या जामिनावर तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांना दिलासा नाकारून उच्च न्यायालयानी चूक केली, असा शेराही सर्वोच्च न्यायालयानी मारला आहे. जामीन अर्जावर सुनावणी करताना निष्णात वकील हरीष साळवे यांनी गोस्वामींची बाजू मांडली. अर्णब गोस्वामी यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे, असं म्हणत असतानाच त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. अन्वय नाईक हे आधीपासूनच आर्थिक चणचणीत होते. आर्थिक तंगीमध्ये होते. त्यांनी आधी त्यांच्या आईची हत्या केली असावी आणि मग आत्महत्या केली असावी, असा तर्क लावत त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. मुळात महाराष्ट्र शासनानी बेकायदेशीररित्या अटक केली या मुद्यावर भर देताना साळवे सर्वोच्च न्यायालयात म्हणाले की अर्णब गोस्वामी हे अतिरेकी आहेत का ? २० सशस्र्त पोलिसांच्या उपस्थितीत त्यांना त्यांच्या घरातून उचलून अलिबागला नेण्यात आलं. त्यांच्यावर काय खुनाचा आरोप होता का ? त्यांच्यावर जर खुनाचा आरोप नाही, ते अतिरेकी नाहीत, तर त्यांना जामिन का देण्यात येत नाहीये ? असा प्रश्नही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विचारला... दरम्यान अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकरावर जोरदार टीका केलेय... अर्णब यांना मिळालेला जामीन ही ठाकरे सरकारला बसलेली चपराक असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.. br br #lokmat #Arnabgoswami #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:21

Your Page Title