राज्यातील जि.प. शिक्षकाला ७ कोटींचा पुरस्कार | Ranjitsinh Disale | The Global Teacher Prize 2020

राज्यातील जि.प. शिक्षकाला ७ कोटींचा पुरस्कार | Ranjitsinh Disale | The Global Teacher Prize 2020

महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषद शिक्षकाला जागतिक दर्जाचा ७ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' हा पुरस्कार त्यांना मिळाला. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना हा 7 कोटी रुपयांचा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.br जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तब्बल ८० पेक्षा जास्त देशातील विद्यार्थ्यांना ते विज्ञानाचे ऑनलाईन धडे देतात.br br #lokmat #RanjitsinhDisale #TheGlobalTeacherPrize #bARbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 842

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:55

Your Page Title