फळ राहिलीत ना फुलं, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी | Tears In The Eyes Of Farmer | Maharashtra News

फळ राहिलीत ना फुलं, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी | Tears In The Eyes Of Farmer | Maharashtra News

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शेतामध्ये आलेले पीक परतीच्या पावसामध्ये वाहून गेल्यामुळे आता काय खायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील आटपाडी तालुक्यातील या शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंबाच्या बागा लावल्या होत्या. मुसळधार झालेल्या पावसामुळे आता या झाडांना फळे आणि फुले सुद्धा राहिली नाही आहेत. कष्टाने उभ्या केलेल्या या बागांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असून डाळिंबाच्या बागांमध्ये फळधारणा झालेली नाही. त्यात ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा पावसाने झोडपल्याने क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. br br #Lokmat #FarmersNews #Fruits #flowersbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:27

Your Page Title