भारतातली हवा गलिच्छ आहे | Look at India, it’s Filthy : Donald Trump on Air Pollution

भारतातली हवा गलिच्छ आहे | Look at India, it’s Filthy : Donald Trump on Air Pollution

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला गलिच्छ म्हटलंय. त्यांच्या या विधानानी अमेरिकेतल्या दक्षिण आशियाई लोकांनी ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केलीय. अध्यक्ष ट्रम्प यांनी हे विधान त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यासोबत झालेल्या वाद विवादाच्या दुसऱ्या अंकात केलंय. चर्चेच्या वेळी वातावरण बदलावरच्या अमेरिकेनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की पॅरीस करारात चीन आणि भारताची सरशी झाली. त्यांना अमेरिकेचा व्यवसाय खेचून घ्यायचा होता. म्हणूनच आपण त्या करारातून माघार घेतली. न्यूयॉर्क टाईम्सनी दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांचं विधान हे दिशाभूल करणारं आहे. हवेतील प्रदुषण हा चीन आणि भारतमधला गंभीर मुद्दा आहे. भारत हा जगातल्या सगळ्यात प्रदुषित देशांमधला एक देश आहे. पण ट्रम्प हे वातावरण बदलासारख्या महत्त्वाच्या मुद्दयावर अमेरिकेचं आणि ईतर देशांचं योगदान यावर बोलत होते. पण त्यांचं विधान हे काही वस्तुस्थिती मांडणारं नव्हतं, असंही न्यूयॉर्क टाईम्सनी म्हटलंय. br br #lokmat #DonaldTrump #AirPollution #India #PMModi br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:57

Your Page Title