Sangol EX MLA Ganapatrao Deshmukh Passed Away In Solapur | गणपतराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

Sangol EX MLA Ganapatrao Deshmukh Passed Away In Solapur | गणपतराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

१९६२ पासून तब्बल ११ वेळा आमदार ते नाव म्हणजे गणपतराव देशमुख.. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांना ओळखलं जायचं.. त्यांच्या नावे हा विक्रमही होता.. साधी राहणी असणाऱ्या आणि सतत लोकांमध्ये राहणाऱ्या गणपतराव देशमुखांनी ५४ वर्ष प्रतिनिधीत्व केलं. कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाही २०१९ मध्ये त्यांनी निवडून लढवली नव्हती. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. असा हा नेता.. आज गणपतराव देशमुख यांचं निधन झालं. त्याचं वय ९६ होतं.. मात्र या वयातही ते मतदारसंघात कार्यरत होते. एसटीने प्रवास करणारा आमदार अशी त्यांची ओळख होती. सामान्याचे प्रश्न आयुष्यभर त्यांनी सोडवले.. आणि शेवटपर्यंत ते सामान्यांचे प्रश्न सोडवत राहिले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.. सोलापुरच्या अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण त्यांचा लढा थांबला आणि प्राणज्योत मालवली. ( Ashwin VO )br br #Lokmat #GanapatraoDeshmukh #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:48

Your Page Title