राजकारण नक्की कोण करतंय? CM Uddhav Thackeray Vs Bhagat Singh Koshyari | Maharashtra News

राजकारण नक्की कोण करतंय? CM Uddhav Thackeray Vs Bhagat Singh Koshyari | Maharashtra News

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील वादाची मालिका सुरुच आहे.. सत्ता स्थापनेपासून सुरु झालेला हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही. आता राज्यपालाच्या दौऱ्यावरुन पुन्हा राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद रंगलाय.. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहेत. आज त्यांनी नांदेड जिल्ह्यात विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित लावली. ठाकरे सरकारनं राज्यपालांच्या या दौऱ्याला विरोध केला होता. त्यानंतरही राज्यपाल दौरा करत आहेत. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप होतायत. राज्यपाल हे सरकारी कामात ढवळाढवळ करतायत, राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत, समांतर सरकार चालवतायत.. अशी टीका सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.br Ashwinanchor br #lokmat #uddhavthackeray #Bhagatsinghkoshyari #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:30