परमबीर सिंगांची उचलबांगडी, 'API' मुळे 'CP' गोत्यात | Mumbai Police CP Param Bir Singh Transferred

परमबीर सिंगांची उचलबांगडी, 'API' मुळे 'CP' गोत्यात | Mumbai Police CP Param Bir Singh Transferred

अंबानींच्या घरासमोर स्फोटकं, नंतर मनसुख हिरेन यांनी आत्महत्या आणि सचिन वाझे यांना अटक या तीन घटनाक्रमांनी महाराष्ट्र सरकारची झोप उडवलीय.. गृहमंत्रालय व पोलीस प्रशासनावर अनेक आरोप झाले.. आणि याचा काय तो परिणाम म्हणून पोलीस दलात मोठी घटना घडली.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, परबमीर सिंग, पोलीस महासंचालक यांच्यात अनेक बैठका झाल्या आणि अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली.. हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत... गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना आता होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे. एकप्रकारे त्यांना बाजूला सारण्याचाच हा प्रयत्न म्हणावा लागणार आहे.. त्यामुळे API सचिन वाझे प्रकरण CP असलेल्या परमबीर सिंगांचा चांगलंत भोवलंय असचं म्हणावं लागेल..br गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे..br br #lokmat #Parambirsingh #Sachinvazecase #Mukeshambani # Mansukhhiren #MaharashtraPolice br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:34

Your Page Title