BJP Pankaja Munde बॉक्स घेऊन उतरल्या रस्त्यावर | Flood In Kolhapur, Sangli | Maharashtra News

BJP Pankaja Munde बॉक्स घेऊन उतरल्या रस्त्यावर | Flood In Kolhapur, Sangli | Maharashtra News

पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहचवणं आवश्यक आहे.. मी प्रत्यक्ष तिथे न जाता मदत पोहचवणार असं म्हणत पंकजा मुंडे मदतीसाठी पुढे आल्या आहेत.. आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या परळीत सक्रिय झालेल्या पाहायला मिळाल्या. नाराजी प्रकरणानंतर त्यांनी भाजपच्या उपक्रमात सहभागी होत रस्त्यावर मदतफेरी देखील काढली. अतिवृष्टीमुळे कोकणात प्रचंड नुकसान झालंय. अनेक लोकांचे जीव गेलेत. तसेच कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. लाखो लोक बेघर झालेत.. तर कोट्यावधी रुपयांचा नुकसानही झालंय.. त्याच पार्श्वभुमीवर पूरग्रस्त भागातील लोकांना मदतीसाठी भाजपच्या वतीने परळीत मदतफेरी काढण्यात आली होती. त्या मदतफेरीत पंकजा मुंडे स्वतः मदत गोळा करण्यासाठी बॉक्स घेऊन फिरत होत्या. यावेळी अनेक नागरिक वस्तू आणि निधीच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र पहायला मिळालं. व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहोचवणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. br br #lokmat #PankajaMunde #BJP #Kolhapur #Sangli #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 102

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:48

Your Page Title