तहसिलदार ज्योती देवरेंनी ऑडिओ क्लिपमधून दिला आत्महत्येचा इशारा | Jyoti Devre Audio Clip Viral

तहसिलदार ज्योती देवरेंनी ऑडिओ क्लिपमधून दिला आत्महत्येचा इशारा | Jyoti Devre Audio Clip Viral

अहमदनगर जिल्ह्यात एका महिला तहसिलदारांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींवर धक्कादायक आरोप करत पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. राष्ट्रवादीचे निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. आत्महत्या केलेल्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून ज्योती देवरे यांनी स्वतःची ऑडिओ क्लिप तयार केली. मी लवकरच तुझ्यासोबत येत आहे, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो याचा उल्लेख ज्योती देवरे यांनी या क्लिपमध्ये केलाय. दमदाटी करणे, मारहाण केल्याचं आपल्या चालकाकडून लिहून घेणे, धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याचे देवरे यांनी क्लिपमध्ये म्हटलंय. कोविड लसीकरणावरून आमदार निलेश लंके यांनी आरोग्य कर्मचार्‍याला मारहाण केली आणि नंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. या घटनेचा उल्लेखही ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप मध्ये केलाय.br Ashwinvo br #lokmat #JyotiDevre #Ahmednagar #Audioclip #Nileshlunke br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 13

Uploaded: 2021-09-13

Duration: 15:45