13 वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन लपवला होता पतीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक. | Lokmat Marathi News

13 वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन लपवला होता पतीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक. | Lokmat Marathi News

पालघर जिल्ह्यातील बोईसर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने13 वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. या प्रकरणाचा कुणालाही तपास लागला नव्हता. मात्र, अखेर हा प्रकार उघडकीस आला आहे.बोईसरमध्ये 4 डिसेंबर रोजी पोलिसांनी फरीदा भारती नावाच्या महिलेच्या घरावर छापा मारला. बोईसर मधील गांधीपाडा परिसरात राहणाऱ्या या महिलेच्या घरात देहविक्रीचे रॅकेट चालवला जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आणि 4 तरुणींची सुटका केली.br पोलिसांनी छापेमारी दरम्यान केलेल्या तपासणीत पतीच्या हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे.43 वर्षांच्या फरीदाने सांगितले की, 12 वर्षांपूर्वी तिने आपला पती सहदेव याची हत्या केली होती. सहदेव झोपलेला असताना फरीदाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सहदेव याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सेप्टिक टाकीतून मानवी सांगाडा जप्त केला असून आता अधिक तपास सुरु आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:39

Your Page Title