CM Uddhav Thackeray and Sharad Pawar | Mahashivaghadi नायक ठाकरेच संभ्रमात | Maharashtra News

CM Uddhav Thackeray and Sharad Pawar | Mahashivaghadi नायक ठाकरेच संभ्रमात | Maharashtra News

शिवसेना अजूनही संभ्रमात -br शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असला तरी शिवसेना अजूनही संभ्रमात आहे. गेल्या काही दिवसांतल्या घटनांकडे पाहिलं, तर शिवसेना या खिचडी सरकारमध्ये समाधानी नाही, हेच दिसून येतं. काल राज्यसभेत भाषण करताना संजय राऊत यांनी ड्रामा केला. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा आहे की नाही, हे स्पष्टपणे न सांगता त्यांनी पीठासीन अधिकाऱ्याचा रोष ओढवून घेतला आणि भाषणातला बराचसा भाग हा रेकॉर्डवरच येऊ दिला नाही. शेवटी मतदानाच्या वेळेस त्यांनी सभात्याग केला. आता सभात्याग केल्यानी आपण महा आघाडी सरकारचा धर्म पाळला असं शिवसेना भासवत असली तरी त्यांच्या सभात्यागाचा थेट फायदा भाजपालाच झाला. कारण सभागृहाची सदस्य संख्या कमी झाली. शिवसेनेनी असं का केल ? हे समजूच शकणार नाही कारण संजय राऊतांनी आपली भूमिका सदनात स्पष्टच केली नाही. br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br #LokmatNews #sharadpawar #uddhavThackeraybr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:03