वरळी: मागण्या मान्य न झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे कोस्टल रोड प्राधिकरणाविरोधात आंदोलन

वरळी: मागण्या मान्य न झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे कोस्टल रोड प्राधिकरणाविरोधात आंदोलन

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोड प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करत आहेत. कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, असं मच्छीमारांचे म्हणणे आहे. मच्छीमारांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आंदोलन करत त्यांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे.


User: Lok Satta

Views: 45

Uploaded: 2021-10-30

Duration: 04:43

Your Page Title