Pune: नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच

Pune: नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच

#nawalebridge #pune #punenews #accident #accidentnews #nawalebridgepunebr पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. br मंगळवारी साताराकडून निघालेल्या कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. br चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. br या अपघातामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. जवळपास ३ किलोमिटर पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. br मागच्या महिन्यात नवले पूल जवळ सात अपघात झाले होते. सततच्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.br या मार्गावर अद्यापही कॅमेरा किंवा स्पीडगन लावलेले नाहीत.


User: Sakal

Views: 1.4K

Uploaded: 2021-11-16

Duration: 03:04

Your Page Title