Alandi | आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक; २ मृत्यू तर अनेक जखमी | Sakal Media |

Alandi | आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक; २ मृत्यू तर अनेक जखमी | Sakal Media |

कोकणातून आळंदी यात्रेसाठी पालखी घेऊन जाणाऱ्या पायी दिंडी मध्ये पिकअप टेम्पो घुसल्याने २ जणांना आपले जीव गमवावे लागले तसेच २० ते २२ वारकरी जखमी झाले. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर साते गावच्या हद्दीत आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.br br खालापूर तालुक्यातील खालापूर, कर्जत, उंब्रे, खोपोली आदी भागातील वारकरी आळंदी यात्रेसाठी पालखी घेऊन पायी दिंडीने येत होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा पीक अप टेम्पो या दिंडीत घुसला. १४ वारकऱ्यांना कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये तर काही जणांना बढे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


User: Sakal

Views: 2.5K

Uploaded: 2021-11-27

Duration: 02:52

Your Page Title