Satara l मुसळधार पावसाचा द्राक्ष, डाळींब बागांना तडाखा l Heavy rain grapes hit pomegranate orchards

Satara l मुसळधार पावसाचा द्राक्ष, डाळींब बागांना तडाखा l Heavy rain grapes hit pomegranate orchards

सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यात गेली तीन दिवसापासून पावसाची रिपरिप व सातत्याने ढगाळ व धुकट हवामान टिकून राहिले. काल शुक्रवारी रात्री सुमारे तीन तास अवकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं म्हसवड भागातील रब्बी हंगामात पेरणी केलेली मका, ज्वारी, गहू, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेत शिवारातील पिके पावसाचे साचून राहिलेल्या पाण्यात बुडाली. माण नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली. विशेत: परिपक्व झालेल्या द्राक्ष व डाळींब बागांना या अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे द्राक्ष व डाळींब फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले.


User: Sakal

Views: 221

Uploaded: 2021-12-04

Duration: 00:55

Your Page Title