Mhaswad l म्हसवडला सिध्दनाथ यात्रा उत्साहात; पोलिसांकडून चोख बंदोबस्त l Sakal

Mhaswad l म्हसवडला सिध्दनाथ यात्रा उत्साहात; पोलिसांकडून चोख बंदोबस्त l Sakal

म्हसवड :"श्री सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं"च्या गजरात गुलाल खोब-याची उधळण करीत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून सर्व परिचित असलेले म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवस्थानच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज देवदिवाळीस दुपारी साडेबारा वाजता रथ मिरवणूकीने करण्यात आली. कोरोनाच्या साथीमुळे प्रशासनाने येथील रथ मिरवणूकीसह यात्रा भरविण्यास मनाई आदेश जारी केले होते. यामुळे येथील यात्रा परिसरासह रथ, मंदीर व शहरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात व यात्रा मंदीर परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काल सकाळपासुन पोलिस उपअधिक्षक निलेश देशमुख यांच्या उपस्थित यात्रा परिसरसह शहरातील रस्त्यावर पोलिसांचे संचलन करण्यात आले होते.


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2021-12-05

Duration: 01:15

Your Page Title