Mumbai | राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 28 वर; सरकारचं टेन्शन वाढलं

Mumbai | राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 28 वर; सरकारचं टेन्शन वाढलं

संपूर्ण जगात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रोन विषाणूची धास्ती वाढली आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. डोंबिवली, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, लातूर पुण आणि त्यानंतर वसई विरार मध्ये आणखी ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात मंगळवारी मुंबईत एक तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 7 रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 8 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एकूण रुग्णांची संख्या 28 वर पोहचली आहे. 28 पैकी 9 जणांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.


User: Maharashtra Times

Views: 176

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:05