गुणरत्न सदावर्तेंचा एसटी कर्मचाऱ्यांसाठी जोरदार युक्तीवाद; हायकोर्टात आज काय-काय घडलं?

गुणरत्न सदावर्तेंचा एसटी कर्मचाऱ्यांसाठी जोरदार युक्तीवाद; हायकोर्टात आज काय-काय घडलं?

#StStrike #StWorkers #MumbaiHighcourt #GunaratnaSadavartenbr हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर जोरदार युक्तीवाद पाहायला मिळाला. राज्य सरकारच्या वतीने अॅड. एस. सी. नायडू यांनी बाजू मांडली, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गुणरत्न सदावर्ते हे युक्तीवाद करण्यासाठी उभे होते. कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीचा निर्णय झालाय, अशी माहिती नायडू यांनी हायकोर्टात दिली. शिवाय एकूण १३ हजार बसगाड्यांपैकी तीन हजार चारशे एसटीच्या बसगाड्या सुरू आहेत, अशीही माहिती कोर्टाला देण्यात आली. आता शाळा कॉलेज सुरू झाले असतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येणार असतील तर आता कोर्टाला त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल, असे संकेत खंडपीठाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरतन सदावर्ते यांना दिले.. पण "९० टक्के संपकरी कर्मचाऱ्यांतर्फे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रतिदावा केला आहे", असं म्हणत सदावर्ते यांनी प्रतिज्ञापत्रांचा गठ्ठाच कोर्टात सादर केला..


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-20

Duration: 03:51

Your Page Title