Mumbai : अपघात झाल्यानं विद्यार्थी रखडले, गेटवर मुलांना रोखलं, परीक्षेपासून वंचित ठेवलं

Mumbai : अपघात झाल्यानं विद्यार्थी रखडले, गेटवर मुलांना रोखलं, परीक्षेपासून वंचित ठेवलं

#Students #Exams #CBSEBord #MaharashtraTimesbr पवई जेवीएलआर मेट्रोच काम सुरू असताना एक भरधाव ट्रक सिप्झ येथे मेट्रो पोलला धडकला. या ट्रकमुळे सकाळी जेवीएलआरवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुकीचा परिणाम सीबीएससी बोर्डाच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षार्थींनाही बसला. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याने पवई निटी रमाडा येथील परीक्षा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले आणि परीक्षेस बसण्यास मज्जाव केला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक गोंधळ पहायला मिळाला. यामुळे परीक्षा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते.


User: TimesInternet

Views: 4

Uploaded: 2021-12-21

Duration: 04:29

Your Page Title