Pune l पुण्यात मुख्य रस्त्यांच्या वाहतूक मार्गात बदल l Changes in the route of main roads in Pune

Pune l पुण्यात मुख्य रस्त्यांच्या वाहतूक मार्गात बदल l Changes in the route of main roads in Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये होणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येतंय . त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये उदयापासून बदल करण्यात आले आहेत. 23 डिसेंबरपासून हा प्रयोगिक तत्वावर हा बदल करण्यात आलाय..br br शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार आहे. त्यासाठी चतुःशृंगी वाहतूक विभागाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. br br सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पाषाण आणि बाणेरकडे जाण्यासाठी आता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातून पाषाण रस्त्यावरून बाणेरकडे जाण्यासाठी अभिमानश्री सोसायटीच्या मार्गाचा वापर करायचा आहे. br पाषाणकडून विद्यापीठ चौकात जाण्यासाठी अभिमानश्री सोसायटीच्या मार्गाचा वापर करायचा आहे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-12-22

Duration: 01:33

Your Page Title