Harbhajan Singh Retirement : हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Harbhajan Singh Retirement : हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

#HarbhajanSinghRetirement #InternationalT20Match #MaharashtraTimesbr भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीयसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भज्जीने निवृत्तीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हरभजन सिंगने २५ मार्च १९९८ रोजी भारताकडून पदार्पण केले होते. भज्जीने १९९८ साली पदार्पण केले आणि २०१६ पर्यंत तो मैदानावर दिसला. हरभजन ४१ वर्षाचा असून त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.गेल्या अनेक वर्षापासून तो भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला नाही. मैदानावर आक्रमक आणि उत्साही असणाऱ्या भज्जीने स्वत:ची खास ओळख तयार केली होती. हरभजनने अखेरची कसोटी आणि वनडे २०१५ साली खेळली होती.


User: TimesInternet

Views: 5

Uploaded: 2021-12-24

Duration: 01:51

Your Page Title