प्राजक्ता माळीला बघण्यासाठी लोकांची अलोट गर्दी; करोना प्रतिबंधक नियम बसवले धाब्यावर

प्राजक्ता माळीला बघण्यासाठी लोकांची अलोट गर्दी; करोना प्रतिबंधक नियम बसवले धाब्यावर

यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले उपस्थित होते. दिग्रस हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं, असं वक्तव्य प्राजक्ता माळीने केलं. यानंतर राठोड समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.


User: Lok Satta

Views: 2.8K

Uploaded: 2021-12-26

Duration: 01:15

Your Page Title