कोल्हापुरचे मावळे मर्दानी खेळाने गाजविणार राजपथ-72nd Republic Day India | Rajpath Program | Kolhapur

कोल्हापुरचे मावळे मर्दानी खेळाने गाजविणार राजपथ-72nd Republic Day India | Rajpath Program | Kolhapur

कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी पण कुस्ती बरोबरच अजून एक गोष्ट इथे आहे ती म्हणजे मर्दानी खेळ. कोल्हापुरी रांगडे गडी ह्या मर्दानी खेळाचे बाळकडूच घेतात. अन् मग मर्द मावळे इथे तुम्हाला दिसतात मर्दानी खेळ आणि कोल्हापुराची एक वेगळी प्रतिमा तयार करताना.. पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे कोल्हापूर. ह्या कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा प्रत्येकाच्या रक्तात इथे तुम्हाला दिसून येतो. त्यामुळेच विविध खेळात निपुण असणारे रांगडे गडीच इथे तयार होतात.. कोल्हापुरच्या शिवाजी पेठेतील स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा ह्या मर्दानी खेळाच्या आखाड्यात तयार झालेल्या मर्द मावळ्यांनी तर कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.. अमृत महोत्सवी भारतीय प्रजसत्ताकदिना निमित्त होणाऱ्या राजपथावरील संचलनात कोल्हापुरचे हे मावळे कोल्हापूरचा रांगडा बाज असलेला मर्दानी खेळ सादर करणार आहेत. कोल्हापूरचा हा पहिलाच मर्दानी खेळाचा संघ आहे जो राजपथावरील संचलनात प्रात्यक्षिक सादर करणार आहे... 72nd Republic Day India | Rajpath Program | Kolhapurbr br #republicdaykolhapur #rajpathkolhapur #lokmat #72RepublicDayIndia #RepublicDaybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 113

Uploaded: 2021-12-26

Duration: 07:07

Your Page Title