विदर्भात गारपिटीसह पावसाची जोरदार हजेरी; हरबरा,तुरीच्या पिकाला फटका

विदर्भात गारपिटीसह पावसाची जोरदार हजेरी; हरबरा,तुरीच्या पिकाला फटका

#RainNews #WeatherDepartment #MaharashtraTimesbr विदर्भात अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे.हवामान तज्ञ अनिल बंड यांचा अंदाज.. २८,२९ डिसेंबरला पूर्व विभागात गारपीटीची शक्यता आहे. सद्याच्या परिस्थितीत हरियाणा व सभोवती पश्चिम चक्रवादळ सक्रिय झालं आहे.विदर्भात २८, २९ डिसेंबरला विदर्भात अमरावती, वर्धा, गोंदिया,नागपूर भंडारा जिल्ह्यात गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली आहे.शिवाजी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस आणि गारपिटीने आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला आहे. या पावसामुळे आता हरबरा आणि तुर आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-28

Duration: 03:01

Your Page Title