नववर्षांच्या जल्लोषावर लादले गेले निर्बंध; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू

नववर्षांच्या जल्लोषावर लादले गेले निर्बंध; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू

बुधवारी मुंबईमध्ये करोनाचे दोन हजार ५१० नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज ३० डिसेंबरला सकाळी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केलीय. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाहीय. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळय़ा किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे.


User: Lok Satta

Views: 53

Uploaded: 2021-12-30

Duration: 02:23

Your Page Title