अभिनेत्री तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

सिंधुताईंच्या अचानक सोडून जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील हजारो व्यक्तींना एक धक्काच बसला आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात ताईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. चित्रपट बघून कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस', अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली आहे. ''अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते. त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीन वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला...! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील अशी भावना पंडित यांनी व्यक्त केली आहे.


User: Maharashtra Times

Views: 136

Uploaded: 2022-01-05

Duration: 01:31