मोदींच्या सुरक्षेतली घोडचूक महागात, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी ? President Rule In Punjab

मोदींच्या सुरक्षेतली घोडचूक महागात, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी ? President Rule In Punjab

PM security breach: Amarinder Singh calls for President's rule in Punjab : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत घोडचूक झाली. पीएम मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि यामुळे मोदींना 15-20 मिनीटे अडकून राहावे लागले. विशेष म्हणजे एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकून पडला होता. पंतप्रधानांना जिथे थांबावे लागले ते ठिकाण अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. या ठिकाणापासून अवघ्या 30 किमी अंतरावर पाकिस्तान आहे. तसेच, या भागात अनेकदा टिफिन बॉम्ब आणि इतर स्फोटके सापडत असतात. त्यामुळेच या प्रकाराची केंद्रानं गंभीर दखल घेतलीय. सुरक्षेचं कारण देत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावायच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती मिळतेय, आता यात अनेक अँगल्स आहेत. सगळ्यात मोठा अँगल आहे पंजाब निवडणुकीचा आणि कृषी कायद्यांमुळे असलेल्या नाराजीचा. पंजाबात राष्ट्रपती राजवट लागली तर निवडणुकांचं काय होणार, कृषी कायद्यामुळे पंजाबात मोदींविरोधात नाराजी आहे त्याचा या साऱ्याशी संबंध आहे का, राष्ट्रपती राजवट लावायला मोदींना काय काय कारणं द्यावी लागतील यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात. सगळ्यात आधी पाहुयात की पंजाबात राष्ट्रपती राजवट लावायची झाली तर केंद्र सरकारला काय करावं लागेल ते... (Aniket VO)br br #lokmat #PresidentRuleInPunjab #ModiPunjabbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 637

Uploaded: 2022-01-06

Duration: 03:51

Your Page Title