सरकारमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचा आणखी एका सेना नेत्याची खदखद; उद्धव ठाकरे आता तरी दखल घेणार का?

सरकारमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचा आणखी एका सेना नेत्याची खदखद; उद्धव ठाकरे आता तरी दखल घेणार का?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे.. यातील सर्वात जास्त शिवसेना पक्षात कुरबुरी असल्याचं पाहायला मिळते.. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला योग्य ती वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला आहे.. ज्येष्ठ नेते रामदास कदम, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार विजय शिवतारे त्यांनी तर जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलेलं आहे.. त्यानंतर यामध्ये आणखी एका नेत्याची भर पडली आहे.. माजी आमदार असलेल्या शिवसेनेच्या या नेत्याने आघाडी सरकारमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचे सांगत शिवसेनेला घरचा आहेर दिला.. कोण आहे तो आमदार, आणि घडलं तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून... (Guruprasad VO)br br #lokmat #उद्धवठाकरे #Shivsena br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 97

Uploaded: 2022-01-06

Duration: 02:51

Your Page Title