Baramati l शिर्सुफळच्या शिरसाई मंदिरात चोरी; घटना सी.सी.टि.व्हि.त कैद l Shirsai Mandir l Sakal

Baramati l शिर्सुफळच्या शिरसाई मंदिरात चोरी; घटना सी.सी.टि.व्हि.त कैद l Shirsai Mandir l Sakal

Baramati l शिर्सुफळच्या शिरसाई मंदिरात चोरी; घटना सी.सी.टि.व्हि.त कैद l Shirsai Mandir l Sakal br br बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री.शिरसाई मंदिरात शुक्रवार (ता.07) मध्यरात्री 12 च्या चोरी झाली .या मध्ये देवीचे सोन्याचे चार हार,चांदीचे दोन हार यासह इतरही साहित्य चोरीला गेले आहेत.यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सदर घटना मंदिरातील सी.सी.टि.व्हि.त कैद झाली आहे.यामध्ये एक तरुण,एक तरुणी चोरी करताना दिसत आहेत. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरीचा तपास सुरू आहे.br बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शुक्रवार (ता.07) रोजी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला. आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. शनिवारी सकाळी पुजाऱ्यांनी ग्रामस्थांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे.br दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत गावात कडकडीत बंद केला आहे.व या घटनेचा सखोल तपास करून गुन्हेगार शोधण्याची मागणी केली आहे.


User: Sakal

Views: 5

Uploaded: 2022-01-08

Duration: 01:14

Your Page Title