२३ स्टेशन, मुंबईहून थेट रेल्वे; बीड जिल्ह्याची पहिली रेल्वे अखेर ट्रॅकवर

२३ स्टेशन, मुंबईहून थेट रेल्वे; बीड जिल्ह्याची पहिली रेल्वे अखेर ट्रॅकवर

आपल्या जिल्ह्यात रेल्वे येणार, रेल्वे येणारं असं बीड जिल्ह्यातील गेल्या तीन पिढ्या ज्याविषयी फक्त ऐकत आल्यात, तो नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आता दृष्टीक्षेपात येताना दिसतोय. १९९० ला मान्यता मिळूनही हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडला होता. पण २०१४ ला मोदी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाने वेग पकडला आणि आता नगर ते परळी या २६१ किलोमीटर मार्गापैकी ६० किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. आता पुढचं लक्ष्य आहे ते म्हणजे आष्टी ते बीड हा टप्पा.. या टप्प्यातील अत्यंत खडतर मानलं जाणारं काम सध्या युद्धपातळीवर सुरुय.br br २६१ किमीपैकी सध्या ६६ किमीचं अहमदनगर ते आष्टी हे काम पूर्ण झालंयbr आष्टी ते बीड आणि बीड ते परळी हे काम सध्या चालूbr अजून ४७ महत्त्वाचे पूल, ७४ छोटे पूल, ५२ रेल्वे ओव्हर ब्रिज, २४ रेल्वे अंडर ब्रिज आणि १७ स्टेशन इमारतींचं काम बाकीbr पूर्ण मार्गासाठी १८२५ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकताbr यापैकी १६३४ हेक्टरचं भूसंपादन पूर्ण, १९१ हेक्टर भूसंपादन बाकीbr या मार्गावर अहमनगरसह नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, किनी, बावी, अंमळनेर,br जाटनांदूर, इगनवाडी, रायमोह, राजुरी, बीड, मौज, घाटसावळी, वडवणी, तळेगाव, जवळा, शिरसाळा,br टोकवाडी आणि सध्याचे परळी हे २३ स्टेशन्स आहेत.


User: Maharashtra Times

Views: 125

Uploaded: 2022-01-08

Duration: 08:32

Your Page Title