COVID19 vaccine: पुण्यात बूस्टर डोस द्यायला सुरुवात

COVID19 vaccine: पुण्यात बूस्टर डोस द्यायला सुरुवात

आजपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. देशभरात सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात देखील बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली. br बूस्टर डोस घेण्यासाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. बुस्टर डोस देताना या पूर्वी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचा बुस्टर डोस मिळेल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली, या लोकांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल.


User: Sakal

Views: 310

Uploaded: 2022-01-10

Duration: 02:58

Your Page Title