महंत मावजीनाथ यांचा अपमान करणाऱ्यांवर तुळजापूरकरांचा कारवाईचा इशारा

महंत मावजीनाथ यांचा अपमान करणाऱ्यांवर तुळजापूरकरांचा कारवाईचा इशारा

तुळजापुर येथील गरिबनाथ मठाचे महंत मावजीनाथ गुरु तुकनाथ बाबा हे उस्मानाबाद येथे न्यायालयीन कामासाठी गेले होते. त्यावेळी उस्मानाबाद नगर परिषदचे नगरसेवक प्रदिप मुंढे यांनी महंत मावजीनाथ यांना अर्वाच्च भाषा वापरली. ही भाषा निंदनीय असुन महंताचा अपमान म्हणजे तुळजापुरकरांचा अपमान आहे असं तुळजापूरकरांचं म्हणणं आहे. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दशावतार मठामध्ये मंगळवारी रात्री तुळजापुरवासियांची बैठक झाली. नगरसेवक प्रदिप मुंढे यांनी महंत मावजीनाथ बाबा यांची माफी मागावी अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करु असं महंतांचं म्हणणं आहे. सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


User: Maharashtra Times

Views: 59

Uploaded: 2022-01-19

Duration: 02:21

Your Page Title