काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यात विलंब होतोय | अमित देशमुख

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यात विलंब होतोय | अमित देशमुख

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नसल्याचा आरोप अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र काँग्रेसमधील ही खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी स्वतः यावर बोलत, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचं यावेळी म्हटलयं. औरंगाबाद शासकीय रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, सरकारमध्ये असून काँग्रेसला न्याय मिळत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही हे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवले. आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांची भावना दूर करायची असेल तर आम्हाला अधिक आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडावी लागेल.


User: Maharashtra Times

Views: 141

Uploaded: 2022-01-25

Duration: 01:42

Your Page Title