कानात झुमका, डोळ्यांत अदा; आलियाच्या साडीतल्या लूकवर चाहते झाले फिदा

कानात झुमका, डोळ्यांत अदा; आलियाच्या साडीतल्या लूकवर चाहते झाले फिदा

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं आलिया दररोज वेगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून प्रमोशन करताना दिसत आहे. आजही तीला पांढऱ्या रंगातल्या साडीत प्रमोशन करताना कॅमेरात कैद केले आहे. ती आपल्या इन्स्टाग्रामवरही फोटो शेअर करते. आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडीचा चित्रपट ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनसाठी आलिया हटके फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. आलिया वेगवेगळ्या अंदाजात चित्रपटाचं प्रमोशन करतेय. तिचा हा लूक सर्वांनाच आवडला असून इन्स्टाग्रामवरही फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेका अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


User: Maharashtra Times

Views: 155

Uploaded: 2022-02-13

Duration: 01:49

Your Page Title