मनसे सोडून जाणाऱ्यांना मी बघून घेईन; राजू पाटलांचा 'गयारामांना' इशारा

मनसे सोडून जाणाऱ्यांना मी बघून घेईन; राजू पाटलांचा 'गयारामांना' इशारा

कल्याण-डोंबिवली मध्ये मनसेने मेळावा भरवत सुमारे ८०० जणांना मनसेत प्रवेश देत शक्ती प्रदर्शन केले आहे. या मेळाव्यात मनसे आमदार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना आणि सोडून जाणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. आमदार पाटील यांनी सांगितले की, फोडाफोडीचे राजकारण करू नका आम्हाला करता येते. मनसे पक्ष सोडून गेलेले भोंगे लोकसभा निवडणुकीत विकले गेले होते, माझी पण आमदारकी यांनी विकली असती. मात्र, ज्यांनी पैसे घेऊन राज ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे, त्यांना सोडणार नाही, मोठ्या पक्षात गेले असले तरी त्यांनी भ्रमात राहू नये, असे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितले. दरम्यान मनसे आमदार यांनी भाषणात भोंगे असा उल्लेख केला, मात्र हे भोंगे कोण असा सवाल नागरिक करू लागले आहेत.


User: Maharashtra Times

Views: 32

Uploaded: 2022-02-21

Duration: 01:22

Your Page Title