रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी

रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नगरीत आज सोन्याचे दर विक्रमी पातळी वर जाऊन पोहोचले. रशिया-युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाला. रशिया युक्रेनमध्ये सुरु असेल्या युद्धामुळे बुधवारी-गुरुवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातही सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. या घडामोडींमुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने 500 ते 700 रुपयांनी वाढलेले दिसले. गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 51 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहेत. सोन्याचे दर आणखी दोन ते तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीची घाई न करण्याचे आवाहन सराफ असोसिएशने केल आहे. युद्धपरिस्थिती आटोक्यात येताच सोन्याचे दर 50 हजारापर्यंत घसरतील असाही अंदाज व्यक्त केला जातोय.


User: Maharashtra Times

Views: 201

Uploaded: 2022-02-24

Duration: 02:19