kolhapur News | टाऊनहॉल बागेत वटवाघळांची वस्ती | Sakal |

kolhapur News | टाऊनहॉल बागेत वटवाघळांची वस्ती | Sakal |

kolhapur News | टाऊनहॉल बागेत वटवाघळांची वस्ती | Sakal |br br br शहरातील भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल बागेतील वटवाघळांचे भलेमोठे वसतीस्थान आहे. बागेतील मोठ्या झाडांवर ही वटवाघळे दिसतात. टॉऊन हॉल बाग परिसरात दिवसभर वटवाघळांच्या चित्काराचा आवाज घुमत असतो. एरव्ही ही वटवाघळे टाऊन हॉल बागेतील म्युझियमच्या समोरील झाडांवर मोठ्या प्रमाणात आढळत असत. यावर्षी मात्र नवल घडले. या वटवाघळांनी म्युझियम समोरील झाडांवरील स्थान सोडून म्युझियमच्या मागील बाजूस असलेल्या तीन झाडांवर ती स्थिरावली आहेत. वटवाघळांनी अशी ही वर्तणूक का केली, हे अजूनही समजलेले नाही. पक्षीतज्ज्ञ, प्राणीतज्ज्ञ ही याबाबत काही सांगू शकलेले नाही. एक मात्र खरे की, म्युझियमसमोरल सर्व झाडांवर एकही वटवाघूळ दिसत नाही. या वटवाघळाला ‘फ्रुट इटिंग फ्लाईंग फॉक्स’ म्हणून ओळखले जाते. ही वाघळे रात्री टाऊनहॉलपासून ते कोकणापर्यंत प्रवास करतात. सकाळी परत आपल्या मुळजागी येतात. br br बातमीदार : अमोल सावंतbr व्हीडीओ : बी. डी.


User: Sakal

Views: 51

Uploaded: 2022-03-15

Duration: 01:41