धक्कादायक ! अकोल्यात अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वाटप

धक्कादायक ! अकोल्यात अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वाटप

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य पोषण आहाचे वाटप करण्याचा धक्कादायक धक्कादायक प्रकार आलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील हा प्रकार समोर आला असून असे प्रकार वारंवार घडत असल्याचे बोलले जाते. लहान मुले सुदृढ व सक्षम व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात खर्च करते. मात्र, मूर्तिजापूर तालुक्यात परिस्थिती काहीसी वेगळीच सांगून जाते. राज्य भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येत. मात्र मूर्तिजापूरातील वसंतनगरमधील अंगणवाडी क्रमांक ६ मधिल बालकांना मुदत बाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सीलबंद पाकीटात पॅकेजिंग तारीख ९ सप्टेंबर २०२१ असून पॅक केल्याच्या तारखेपासून ते फक्त ४ चार महीन्यांपर्यंत वापरण्याची सुचना ठळक व स्पष्ट लिहिलेली असताना देखील या अंगणवाडीतून मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले, हा प्रकार पाहून पालकांनीही संताप व्यक्त केला.


User: Maharashtra Times

Views: 36

Uploaded: 2022-03-27

Duration: 02:06

Your Page Title