Nagpur | नागपूर महिला काँग्रेसचं महागाईविरोधात आंदोलन | Congress Party | Sakal

Nagpur | नागपूर महिला काँग्रेसचं महागाईविरोधात आंदोलन | Congress Party | Sakal

नागपुरात महिला काँग्रेसच्या वतीनं महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने देशात महागाई वाढत असल्याचा आरोप करत ‘थाली-वाटी बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. व्हरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली केंद्र सरकारविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. शिवाय, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना पुष्पहार वाहत प्रतिकात्मक निषेधही नोंदवण्यात आला. सरकारने सामान्य माणसाच्या भावना लक्षात घेऊन महागाई नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.


User: Sakal

Views: 56

Uploaded: 2022-04-04

Duration: 01:51