Nashik News | चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार | Sakal Media

Nashik News | चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार | Sakal Media

Nashik News | चैत्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार | Sakal Media br br साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. 10 ते 16 एप्रिलदरम्यान सप्तश्रृंगीदेवीच्या चैत्रोत्सवात देवीचं मंदिर भाविकांसाठी २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. सप्तश्रृंगी देवी ट्रस्टने हा निर्णय घेतलाय. चैत्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. त्यात मागील २ वर्षे कोरोनामुळे भाविकांना चैत्रोत्सव साजरा करता आलेला नसल्यानं यंदा भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्याबरोबरच आलेल्या सर्व भाविकांना देवीचं दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. तर, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी जाणाऱ्या आणि मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्गाचं नियोजन करण्यात आलं असून निगराणीसाठी २५३ क्लोज सर्किट कॅमेरांची व्यवस्था करण्यात येणार आहे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-04-05

Duration: 00:54

Your Page Title