Pune: पुण्यातील रुग्णालयं कोरोनामुक्त

Pune: पुण्यातील रुग्णालयं कोरोनामुक्त

पुण्यातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात आज एकही रुग्णाची नोंद नसल्याची माहिती पुणे महानगर पालिकेकडून देण्यात आली. इतकचं नाही तर पुण्यातील नायडू हॉस्पिटल मध्ये असलेल्या एकमेव रुग्णाला देखील आज डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या २ वर्षांपासून कोरोना चे हॉटस्पॉट बनलेल्या पुणे शहराचे आज मोकळा श्वास घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. सध्या पुणे शहरात एकूण ९८ ॲक्टिव रुग्ण असून हे सगळे गृह विलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.


User: Sakal

Views: 214

Uploaded: 2022-04-06

Duration: 01:23