Pune News | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी | Sakal

Pune News | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी | Sakal

पुणे अहमदनगर महामार्गाचे पुणे बाजुकडे जाणारे रोड वर एका कार चालकाचे वेगावर नियंत्रण सुटले आणि ती कार महामार्गाचे मधोमध असलेल्या डिवायडर कठडयास धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ती कार पुणे पुढे अहमदनगर च्या दिशेने चाललेल्या लक्झरी बस ला धडकली. या अपघातात त्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. लक्झरी बस मधील चालकासह २२-२५ जण जखमी झाले आहेत यातील ५ जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. ती धडक जोरात असल्याने बस उजवे कुषीवर पल्टी होवुन घासपटत जावुन अहमदनगर बाजुकडे जाणारे रोडचे उत्तरेस असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलचे मुख्य दरवाज्यात घुसुन पडली.


User: Sakal

Views: 2K

Uploaded: 2022-04-11

Duration: 01:04