Sonam Kapoor; सोनम कपूरच्या सासरी चोरी करणारी नर्स पतीसह अटकेत

Sonam Kapoor; सोनम कपूरच्या सासरी चोरी करणारी नर्स पतीसह अटकेत

अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरी झालेल्या चोरीचा दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं छडा लावलाय. याप्रकरणी पोलिसांनी सोनमच्या घरातील नर्स अपर्णा विल्सन, तिचा पती नरेश कुमार सागर आणि ज्वेलर देव वर्मा यांना बेड्या ठोकल्यात. यावेळी पोलिसांनी १०० हिरे, ६ सोन्याच्या चेन, हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्याचं ब्रेसलेट, कानातल्याचं जोड, १ तांब्याचं कॉईन आणि i-10 कार जप्त केलीय. सोनम कपूरच्या सासरी झालेल्या चोरीत जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल चोरीला गेला होता. क्राईम ब्रांचनं आतापर्यंत ३२ कर्मचारी, ६ नर्सेस आणि नातेवाईकांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला. अपर्णा ही सोनमचा पती आनंद अहुजांच्या आजीची केअरटेकर होती. एके दिवशी तिने घरातील कपाटात सोनं आणि रोख रक्कम पाहिली आणि पुढे पतीला सांगितली.


User: Sakal

Views: 217

Uploaded: 2022-04-15

Duration: 01:20

Your Page Title